शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 07:03 IST

Navi Mumbai : सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी गुरूवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास १५ ठिकाणी मानवी साखळी केली. १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले. हजारो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी संघटित होऊन भविष्यात नामकरणासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.

सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी आदर आहे, त्यांचे नाव राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाला देता येईल, परंतु नवी मुंबईमधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड चार जिल्ह्यांतील हजारो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. विमानतळाच्या जागेवर मानवी साखळीने दि. बा. पाटील यांचे नाव तयार करण्यात आले होते. प्रत्येक गावातील नागरिकांनी जबाबदारी वाटून किमान ८०० मीटरची साखळी तयार करण्याची जबाबदारी घेतली होती. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर लवकरच सिडको भवनला घेराव घालण्यात येणार आहे. याबाबत भावना तीव्र असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. 

विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव - एकनाथ शिंदेमुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल असा ठराव सिडकोने आधीच केलेला आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की भविष्यात दुसर्‍या मोठ्या प्रकल्पाला ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला आधीच दिले आहे. दि.बा. पाटील  यांचा आम्ही आदरच करतो. मात्र सिडकोने त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा ठराव केलेला नव्हता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ