शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालय उघडण्यात मग्न

By admin | Updated: March 23, 2017 01:45 IST

आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण

मयूर तांबडे /पनवेलआगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सारेच पक्ष आपापली कार्यालये उघडण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षही आता पुढे सरसावले असून, पक्षाची कार्यालये इच्छुकांच्या गर्दीने फुल्ल होत आहेत. आपापल्या प्रभागात नवीन पक्ष कार्यालये उघडण्यात सारेच पक्ष आघाडीवर आहेत. पक्ष कार्यालय कार्यान्वित करण्यासंबंधी अनेकांनी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे पक्षांच्या कार्यालयांचे शटर पुढील पाच वर्षांकरिता बंद केली जातात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कायमस्वरूपी कार्यालये उघडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पनवेल महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे २०१७ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात पक्षाचे स्वतंत्र कार्यालय उघडण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. पनवेलमध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच लगीनघाई सुरू झालेली दिसत आहे, तर काहींनी आपापल्या प्रभागात पक्ष कार्यालये काही महिन्यांपूर्वीच उघडली देखील आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे जर आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर पक्षांतराला देखील अच्छे दिन येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळते व कोण नाराज होतात हे काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे. कार्यालयामार्फतच जनतेचे प्रश्न सोडवले जातात असे राजकारण्यांचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका जवळ आल्यावरच पक्ष कार्यालये उघडली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे यातील काही कार्यालये केवळ निवडणुकीकरिताच उघडली जाणार आहेत की कायमस्वरूपी असणार आहेत याबाबत अनभिज्ञता आहे. मतदारांच्या समस्या, प्रश्न मांडण्यासाठी अनेकांनी आपल्या पक्षाची कार्यालये स्थापन केली आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांच्या याद्या, मतदार याद्यांचे अवलोकन याकरिता या कार्यालयाचा उमेदवारांना उपयोग होणार आहे, तर अनेक ठिकाणची कार्यालये जशी उघडत आहेत तशीच काही दिवसांनी ती बंद होतात. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी असतात. अनेकदा उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काही दिवसातच कार्यालयाला टाळे ठोकले जाते तर विजयी उमेदवार देखील काहीच दिवसात आपले कार्यालय बंद करतो. त्यामुळे ही पक्ष कार्यालये निवडणुकीनंतर उघडी राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.