शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे

By admin | Updated: December 25, 2015 02:37 IST

शहरातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी यासाठी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेने शिवआधार सराव स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : शहरातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी यासाठी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेने शिवआधार सराव स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले होते. शहरातील १८८४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाच गटांतील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे. नवी मुंबई आधुनिक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून देशभर ओळखले जात आहे. नर्सरीपासून वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत अनेक शिक्षण संस्था येथे आहेत. परंतू शहरवासीयांना स्पर्धा परिक्षांविषयी आवड निर्माण करण्यासाठीची एकही चांगली संस्था नाही. महापालिकेच्या बेलापूरमधील ग्रंथालयातील अभ्यासिका सोडली तर विद्यार्थ्यांना अभ्यासाठी दुसरा पर्याय नाही. ऐरोली मतदार संघामध्ये काहीच सुविधा नाही. यामुळे नगरसेवक संजू वाडे यांनी मोफत मार्गदर्शन व सराव स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले होते. जवळपास ६५ शाळांमध्ये मोफत मार्गदर्शन करून पाच गटामध्ये सराव परिक्षेचे आयोजन केले होते. तब्बल १९००३ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. यामधील १८८४३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. पहिल्या गटात स्वप्नाली शेलार, गायत्री शिरसाट, अस्मीता पाटील दुस-या गटामध्ये पुजा पिसाळ, ज्योती शेखावत, मितेश भोसले तिस-या गटात प्रिया झा, प्रतिक्षा पवार, तेजस काळे चौथ्या गटात प्रांजली नाईक, रोहीत यादव, सानिया सावंत पाचव्या गटात दिपेश झरेकर,वैष्णवी बिरादार, यशराज मानकुमरे प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी परिक्षेचे आयोजन केले जाणार असून तज्ञांकडून व शासकिय सेवेतील सनदी अधिकाऱ्यांकडून मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)