तळोजा एमआयडीसीत आढळला बिबट्या; परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:33 IST2018-11-22T19:33:36+5:302018-11-22T19:33:46+5:30
तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

तळोजा एमआयडीसीत आढळला बिबट्या; परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
- वैभव गायकर
पनवेल: तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. १९ रोजी पहाटे ६.३० च्या दरम्यान एमआयडीसीमधील पेणधर गावाशेजारील कोलटेन कंपनीची कंपाऊंड वॉल पार करून बिबट्या कंपनीत घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे. लाखो कामगार याठिकाणी कार्यरत असून, या परिसरात एकूण १४ गावांचा वेढ़ा आहे.
हा बिबट्या नेमका कुठून आला याचा शोध वनविभाग घेत आहे. वनविभागाने संबंधित सीसीटीव्हीमधील प्राणी बिबट्या असल्याचे मान्य केले आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा -हास होत आहे. सिमेंटच्या जंगलामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याने अशा प्रकारे हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. या सीसीटीव्ही व्हिडीओमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.