सिडकोच्या शिल्लक घरांसाठी आज सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 02:53 IST2019-02-14T02:53:01+5:302019-02-14T02:53:14+5:30

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया होणार आहे.

 Leaving today for CIDCO's remaining homes | सिडकोच्या शिल्लक घरांसाठी आज सोडत

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी आज सोडत

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया होणार आहे.
सिडकोने आॅगस्ट २०१८ मध्ये १५ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढली होती. परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ११०० घरांची विक्री झाली नाही. या शिल्लक घरांत ७३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित १०२७ सदनिका अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका केवळ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यांसाठी आहेत.
या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६०,००० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. मागील १५ दिवसांत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली, त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत निघणार आहे.

उपलब्ध घरांचा तपशील
तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये १४,८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प उभारला जात आहे. संगणकीय सोडतीनंतर ११०० घरे शिल्लक आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे ३९ तर द्रोणागिरी येथे ३४ घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ६५०, खारघर ५९, कळंबोली ५३, घणसोली ४३ व द्रोणागिरी येथे २२२ घरे आहेत.

Web Title:  Leaving today for CIDCO's remaining homes

टॅग्स :cidcoसिडको