शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा टक्के योजनेला राज्य शासनाचा खोडा , लिंकेजचा प्रश्न धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:31 IST

सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पात्रतेनुसार भूखंड देता यावेत, यादृष्टीने लिंकेजची अट काढून टाकण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारकडे पाठविला आहे. परंतु मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे. त्यामुळे साडेबारा टक्के योजनेतीलभूखंड वाटपाची प्रक्रिया ठप्प पडली आहे.संपादित जमिनीचा मोबदला म्हणून ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई तसेच रायगडमधील पनवेल आणि उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंडाचे वाटप केले जाते. परंतु सुरुवातीपासूनच या योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली. याचा परिणाम म्हणून तीस वर्षे उलटले तरी ही योजना सुरूच आहे. सध्या केवळ ८ टक्के प्रकरणे शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून ही योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी घेतला होता. तसेच उर्वरित प्रकरणे निकाली काढण्यासाठी भूखंड वाटपासाठी असलेली हद्दीची अट अर्थात लिंकेज काढून टाकल्यास पात्रताधारकांना उपलब्ध जागेनुसार भूखंडांचे वाटप करणे शक्य होईल आणि शेवटच्या पात्रताधारकाला या योजनेचा लाभ घेता येईल, अशी त्यांची योजना होती. त्यानुसार लिंकेजची अट काढून टाकण्यासंदर्भातील एक प्रस्ताव वर्षभरापूर्वी त्यांनी राज्य शासनाला सादर केला होता. मात्र राज्य शासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पात्रता मंजूर होवूनसुध्दा केवळ भूखंड उपलब्ध नसल्याने शेकडो प्रकरणे रखडून पडले आहेत.लिंकेजसंदर्भातील प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी सिडकोचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.गेल्या महिन्यात यासंदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत एक बैठकही झाली. या बैठकीत लिंकेज उठविण्याच्या प्रश्नाबाबत सिडकोने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा. त्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची गरज नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे समजते, परंतु तशा आशयाचे लेखी पत्र सिडकोला अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे लिंकेजबाबत निर्णय घ्यायचा की नाही, याबाबत सिडकोत संभ्रम निर्माण झाला आहे.सिडकोच्या व्यापारी वृत्तीचा फटकासिडकोने मागील काही वर्षात भूखंडांच्या विक्रीवर भर दिला. निविदा काढून भूखंडांचे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केले गेल्याने भूखंडांचे दर गगनाला भिडले. त्यामुळे सिडकोने भूखंड विक्रीचा सपाटा लावला. हे करीत असताना भविष्यकालीन विकास प्रकल्पाचा कोणताही विचार केला गेला नाही. साडेबारा टक्के भूखंड योजनेसाठी एकूण किती भूखंड लागणार आहे, याचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात भूखंडांची कमतरता निर्माण झाली आहे.काय आहे लिंकेज?प्रकल्पग्रस्तांना त्यांच्याच विभागात साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळावेत, यासाठी राज्य शासनाने हद्दीची मर्यादा आखून दिली आहे. त्यानुसार त्या त्या विभागात साडेबारा टक्केचे पॉकेट तयार करण्यात आले आहेत. परंतु आता साडेबारा टक्केच्या बहुतांशी पॉकेटमधील भूखंड संपले आहेत.विशेषत: ठाणे विभागात हा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे लिंकेजची अट रद्द करून भूखंड वाटपासाठी पर्याय निर्माण करण्याची सिडकोची योजना आहे. ल्ािंकेजची अट रद्द झाल्यास प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पात्रतेनुसार संपूर्ण नवी मुंबईच्या कोणत्याही पॉकेटमध्ये भूखंडाचे वाटप करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई