शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सुखी आयुष्यासाठी अध्यात्माची जाण हवीच

By admin | Updated: June 30, 2017 02:59 IST

जीवन विद्या मिशद्वारे आयोजित वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी झालेल्या व्याखानामध्ये ‘शोध आनंदाचा’

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जीवन विद्या मिशद्वारे आयोजित वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी झालेल्या व्याखानामध्ये ‘शोध आनंदाचा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ‘सुखी आयुष्याकरिता अध्यात्माची जाण असणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी केले. या वेळी नैराश्याचे वाढते प्रमाण, तरुणांमधील आत्मविश्वासाची कमतरता, मानवी दृष्टिकोन, पैशांच्या मागे धावणारी पिढी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्याबद्दल चांगले विचार करायला शिका, चांगले बोला, चांगले वागा, निस्वार्थीपणे जगा, असा मोलाचा संदेश या ठिकाणी देण्यात आला. जोरदार पावसातही जीवन विद्या मिशनच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘शोध आनंदाचा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जीवनातील खरा आनंद, सुखासाठी विज्ञान आणि विवेकाची सांगड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये ‘शोध आनंदाचा’ ही व्याख्यानमाला राबविली जाणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. जीवन विद्या मिशनमधील तरुण स्वयंसेवकांनी या ठिकाणी अनुभव सांगितले. जीवन विद्या मिशनच्या वतीने विविध विभागांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यश आणि आनंदाकरिता मानवी दृष्टीत कोनाचे महत्त्व सांगताना, ‘दृष्टिकोन हा लघुकोन असता कामा नये, तर तो नेहमी विशालकोन असावा’, असेही पै यांनी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी मान्यवर उपस्थित होते.