शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुटका

By admin | Updated: January 5, 2016 02:08 IST

देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. तुर्भे येथे तिला डांबून ठेवल्यानंतर तिच्यावर बलात्कारदेखील झाला आहे.

नवी मुंबई : देहविक्रीसाठी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. तुर्भे येथे तिला डांबून ठेवल्यानंतर तिच्यावर बलात्कारदेखील झाला आहे. वाशी परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानुसार सदर मुलीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानेही मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. यादरम्यान हरवलेली मुलगी तुर्भे परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने परिसरात झडती घेतली. यावेळी आंबेडकर नगरमधील एका घरात डांबून ठेवलेल्या स्थितीत ही अल्पवयीन मुलगी आढळून आली. त्यानुसार या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी जाकीया कुरेशी (२६) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिनेच सदर अल्पवयीन मुलीचे देहविक्रीसाठी अपहरण करून स्वत:च्या घरात डांबून ठेवले होते. पीडित अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिने त्या मुलीला वाशी गाव येथे भेटायला बोलावले होते. यानंतर घर दाखवण्याच्या बहाण्याने ती मुलीला घेऊन तुर्भे येथे आली होती. मात्र यानंतर तिला स्वत:च्या घरी न जाऊ देता डांबून ठेवले होते. जाकीया हिचा देहविक्री व्यवसायाशी संबंध असल्याने सदर मुलीलाही ती याच व्यवसायासाठी वापरणार होती. त्यानुसार जाकीया हिने ठरवलेल्या एका ग्राहकाने सदर अल्पवयीन मुलीवर बलात्कारदेखील केलेला आहे. (प्रतिनिधी)