शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; निकृष्ट कामामुळे दोन वर्षांतच दुरुस्तीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 12:43 AM

सर्व्हिस रोडचा वापर

कळंबाेली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कळंबोली वसाहतीजवळ दोन वर्षांपूर्वी कळंबोली गाव ते पाण्याच्या टाकीपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात आला. दोन वर्षांतच पुलाचे जोडणी अंतर वाढल्याने कळंबोली उड्डाणपुलावरील मुंब्रा जाणारी मार्गिका काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी बाजूचा सर्व्हिस रोड त्याचबरोबर स्टील मार्केट रोडचा वापर करण्यात येत आहे. २५ महिन्यातच पुलाचे काम निघाल्याने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पनवेल-मुंब्रा महामार्गावर लहान मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबर वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा बसवण्यासाठी कळंबोली येथील उड्डाणपुलाची अत्यंत गरज होती. त्यासाठी राजकारणी, नागरिक, सामाजिक संस्थेकडून उड्डाणपुलासाठी झालेल्या मागणीची दखल घेत, रस्ते विकास महामंडळाने कळंबोली या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार  हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलासाठी ६१.३७ कोटी खर्च करण्यात आला आहे. ११३० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण करुन फेब्रुवारी २०१९ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यामुळे जेएनपीटी, मुंब्रा, तळोजा एमआयडीसी येथे जाणा-या वाहनचालकांना दिलासा मिळाला तर वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली. वाहतूक पोलिसांवर येत असलेला ताण थोड्याफार प्रमाणात कमी झाला. पण दोनच वर्षांत उड्डाणपुलाचे काम काढल्याने या पुलाच्या बांधकाम दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.दोन वर्षांत दोनदा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदउड्डाणपूल बांधल्यानंतर सहा महिन्यात पावसाळी दिवसाला सुरुवात झाली. तेव्हा पावसात उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी काही दिवस मार्गिका बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता जोडणीतील अंतर वाढल्याने हा उड्डाणपूल काही दिवसाकरिता बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड तथा लोहपोलाद मार्केट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोंडी होऊ नये यासाठी लक्ष ठेवून आहेत.कळंबोली उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम सुरू आहे. मान्सूनपूर्व कामे असल्याने ती आता कामे करुन घेण्यात येत आहे. मुंब्रा जाणारी मार्गिका कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे. चार दिवसात काम पूर्ण करुन मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल.    - राकेश सोनवणे, अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ