पनवेल क्षेत्रात शिवसेनेत अंतर्गत कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:52 AM2019-08-02T02:52:13+5:302019-08-02T02:52:16+5:30

गटबाजीचे राजकारण : नव्या नेमणुकांनंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Internal clashes between Shiv Sena in Panvel area | पनवेल क्षेत्रात शिवसेनेत अंतर्गत कलह

पनवेल क्षेत्रात शिवसेनेत अंतर्गत कलह

Next

वैभव गायकर

पनवेल : ऐन विधानसभेच्या तोंडावर पनवेल शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. या नेमणुका करताना अनेक जुन्या पदाधिकाºयांना डावलून नव्याने नेमणुका करण्यात आल्याने शिवसेनेतील एक गट नाराज आहे. या नाराज गटाने आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीत सेनेला एकही जागेवर यश संपादित करता आले नाही. पालिका निवडणुकीत भाजप युतीसाठी आग्रही असताना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला. स्वबळावर निवडणूक लढवून सेनेला भोपळाही फोडता आला नसल्याने सेनेमध्ये अंतर्गत दुफळी निर्माण झाली.

वर्षभरापूर्वी पनवेल क्षेत्रासाठी शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. या वेळी रायगडचे तत्कालीन संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्याविरोधात पक्षातील पदाधिकाºयांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
लोकसभा निवडणुकीत पनवेल तालुक्यातून मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगले मताधिक्य मिळाले. यात मित्रपक्ष भाजपचाही मोठा वाटा होता. मात्र, सेनेचा उमेदवार असल्याने सेनेतील पदाधिकाºयांमध्ये नवचैतन्य संचारले होते. यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पदाधिकाºयांच्या निवडीबाबत पुन्हा एकदा नाराज गटाने राजीनामे दिले आहेत. यामध्ये ३२ आजी-माजी पदाधिकाºयांचा समावेश असून अनेक वर्षांपासून तालुक्यात प्रामाणिकपणे कार्य करणाºया पदाधिकाºयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सर्व पक्षांचे नगरसेवक महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. एकीकडे सेनेच्या उभारणीचे प्र्रयत्न सुरू असताना सेनेतील अंतर्गत गटबाजी संपण्याचे नाव घेत नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवर सेना-भाजपची युती होईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला असताना पनवेल विधानसभेतील सेनेचा अंतर्गत कलह सेनेला चांगलाच महागात पडू शकतो. त्यामुळे नाराज पदाधिकाºयांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राजीनामा दिलेल्या पदाधिकाºयांमध्ये कळंबोली शहरप्रमुख अविनाश कोंडिलकर, विभागप्रमुख घनश्याम नाईक, विभागप्रमुख विश्वास पेटकर आदीसह इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे.

सेनेमध्ये अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करीत आहे. त्यामुळे पक्षाने नव्याने संधी देणे गरजेचे आहे. मी प्रभाग क्रमांक ९ मधील विभागप्रमुख पदाचा राजनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून माझे काम सुरूच राहणार आहे.
- विश्वास पेटकर,
विभागप्रमुख, प्रभाग ९

पनवेल क्षेत्रातील सर्व पदाधिकाºयांनी राजीनामे दिलेले नाहीत, तर केवळ कळंबोलीमधील पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. ती संख्या १० ते १२ जणांची आहे. नाराज पदाधिकाºयांची समजूत काढून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणार आहोत.
- प्रथमेश सोमण,
महानगर संघटक, पनवेल शिवसेना

Web Title: Internal clashes between Shiv Sena in Panvel area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.