शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्बांधणीच्या परवानगीसाठी अडवणूक

By admin | Updated: March 23, 2017 01:46 IST

मोडकळीस आलेल्या शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे.

कमलाकर कांबळे / नवी मुंबई मोडकळीस आलेल्या शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास दहा प्रकरणात ना हरकत देवू करण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्ष प्रमाणपत्र देताना सिडकोच्या वसाहत विभागाकडून अर्जदारांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.सिडकोनिर्मित जुन्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्याने त्या धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने अडीच चटई निर्देशांक मंजूर केला आहे. मात्र त्यासाठी सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने पुनर्बांधणीच्या कामाला खीळ बसली. राज्य सरकारच्या फेब्रुवारी २0१५ रोजीच्या अध्यादेशानुसार पुनर्बांधणीसाठी असोसिएशनमधील १00 टक्के रहिवाशांची तर सोसायटीमधील ७0 टक्के रहिवाशांची अनुमती असणे आवश्यक आहे. नेमका हाच कळीचा मुद्दा बनल्याने सुरुवातीच्या काळात सिडकोने ना हरकत देण्यास असमर्थता दर्शविली. मात्र राजकीय हस्तक्षेप व इतर कारणांमुळे असोसिएशनमधील सर्वच रहिवाशांची अनुमती मिळत नाही. त्यामुळे सोसायटी स्थापन करून किमान ७0 टक्के रहिवाशांच्या मान्यतेवर पुनर्बांधणीसाठी ना हरकत द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली. यासंदर्भात अनेकांनी न्यायालयातही धाव घेतली. नियम व अटींमुळे नाहक रहिवाशांना वेठीस धरणे उचित ठरणार नाही, ही बाब राज्य सरकार व सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेवून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी पुनर्बांधणीसाठी ना हरकत देण्याचे धोरण अवलंबिले. सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनीही यात आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार आतापर्यंत पुनर्बांधणीच्या जवळपास आठ ते दहा प्रकरणांना तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. मात्र महिना उलटला तरी अर्जदारांना अद्याप प्रत्यक्ष ना हरकत प्रमाणपत्राचा ताबा मिळालेला नाही. सिडकोच्या वसाहत विभागाकडून या अर्जदारांची नाहक अडवणूक केली जात आहे. विविध कारणे पुढे करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यास विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जावू लागली आहे.