अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:36 IST2025-11-01T07:01:42+5:302025-11-01T08:36:33+5:30
७० वर्षीय आरोपी व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची

अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
नवी मुंबई : आईनेच पोटच्या १० वर्षाच्या मुलीला ७० वर्षीय व्यक्तीच्या वासनेचे बळी पाडल्याची घटना समोर आली आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी ही घटना उघड करून पीडित मुलीची आई व अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संबंधित व्यक्तीने मुलीच्या आईला अडीच लाख रुपये व महिना रेशन देत असल्याने मुलीची आई तिला रात्री त्या व्यक्तीकडे सोडून परत आपल्या घरी यायची.
एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सहायक निरीक्षक योगेश देशमुख, उपनिरीक्षक सरिता गुडे यांचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी तळोजा परिसरातील एका घरावर छापा टाकला त्यामध्ये घरात ७० वर्षीय व्यक्ती व १० वर्षाची मुलगी मिळून आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिची आई रात्री तिला या व्यक्तीकडे सोडून जात असल्याचे सांगितले. यानंतर ती व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची, तर या प्रकरणाची यानंतर ती व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची, तर या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी द्यायचा. मागील दोन वर्षांपासून त्याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीची आई व त्या व्यक्तीवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे शुक्रवारी न्यायालयाने या दोघांनाही ४ नोव्हेंबरपर्यंतची कोठडी सुनावली.