शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पोलीस चौकीसमोर अवैध वाहतूक

By admin | Published: March 30, 2015 12:22 AM

वाशीतील वाहतूक पोलीस चौकीसमारून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. एस. टी. महामंडळाच्या थांब्यावर खाजगी बसेस व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत.

नवी मुंबई : वाशीतील वाहतूक पोलीस चौकीसमारून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. एस. टी. महामंडळाच्या थांब्यावर खाजगी बसेस व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला असून या समस्येकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतुकीची समस्या वाशी परिसरात निर्माण झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतूक चौकी सुरू करण्यात आली आहे. पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी रोडवर उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून दंड वसुलीकडे जास्त लक्ष देत आहेत. यामध्येही व्यावसायिकांना अभय देवून सर्वसामान्यांवर कारवाई होत आहे. पोलीस चौकीसमोर एस.टी. चा थांबा आहे. या थांब्यावर खाजगी बसेस उभ्या राहू लागल्या आहेत. त्याचा परिणाम एस. टी. च्या उत्पन्नावर होत आहे. अनेक वेळा या थांब्यावर कार उभ्या करण्यात येत आहेत. रिक्षाही याच ठिकाणी उभ्या असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होवू लागली आहे. खाजगी जीप व ट्रॅक्सही येथे उभ्या राहू लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांसमोर अनागोंदी कारभार सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कोणी आक्षेप घेतल्यास दाखविता यावी यासाठी कारवाई दाखविली जात आहे. अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याकडे पोलीस दुर्लक्ष करू लागले आहेत. पोलीस चौकीसमोर वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तक्रारी करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांची नाराजी वाढत आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु सुटी असल्याने अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.