शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर

By नारायण जाधव | Updated: December 26, 2025 09:00 IST

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान ...

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान राज्यात २७ महापालिका होत्या. एकूण १२६८ वॉर्डात १७४३८ उमेदवार उभे होते. त्यात गेल्यावेळी २७३६ नगरसेवक निवडून आले होते. सर्वाधिक १०९९ नगरसेवक निवडून आल्याने भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपापाठोपाठ एकसंघ शिवसेनेचे ४८९ तर अस्तित्वासाठी झटणाऱ्या काँग्रेसचेसुद्धा ४३९ नगरसेवक होते. यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी २९४ जागांवर चौथ्या स्थानावर होती. याशिवाय राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २६ तर मायावतींच्या बसपाचे ३८ नगरसेवक होते. शेकाप, बहुविकास आघाडीसह इतर नोंदणीकृत पक्षांचे १५४ आणि ८९ अपक्ष म्हणून निवडून आले होते.

कोणाची किती मजल?शिवसेना : मुंबईत ८४, ठाणे ६७ आणि कल्याण-डोंबिवलीत ५२ अशी पन्नाशी ओलांडली होती.राष्ट्रवादी : नवी मुंबईत ५२, गृहजिल्हा पुण्यात ३९, पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ आणि ठाण्यात ३४ अशी मजलमारली होती.मनसे : मुंबईत ७, कल्याण-डोंबिवली ९, नाशिक ५, पुणे २, पिंपरी-चिंचवड १ आणि चंद्रपूर २ अशी मजल मारली होती.

भाजपनागपूर १०८, मुंबईत ८२, पुणे ९७, पिंपरी-चिंचवड -७७, नाशिक ६६, मीरा-भाईंदर ६१, पनवेल ५१,धुळे ५०, जळगाव ५७ या शहरात ५० पार नगरसेवक होते.काँग्रेसनांदेडमध्ये ७३, भिवंडीत ४७, लातूर ३३, मुंबईत ३१, परभणी ३१, मालेगाव २८, कोल्हापूर २७, नागपूर २९, अमरावती १५, अकोला १३, चंद्रपूर १२, सोलापूर १४, सांगली २०, औरंगाबाद आताचे छ. संभाजीनगर, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर मध्ये १० अशी दुहेरी संख्या ओलांडली होती.

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे प्राबल्य?मुंबई/कोकण : भाजप आणि तेव्हाची एकसंध शिवसेना या पक्षांचे प्राबल्य प्रामुख्याने दिसून येते.   उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात भाजप हा प्रमुख शक्तिकेंद्र आहे.  पश्चिम महाराष्ट्र : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर असला तरी राष्ट्रवादीची स्थितीही मजबूत होती. कोल्हापूर, सांगलीत काँग्रेस–राष्ट्रवादी प्रभावी दिसून येते.   मराठवाडा : मराठवाड्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष दिसतो. विदर्भ : विदर्भात भाजपचे वर्चस्व सर्वाधिक ठळक आहे. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद गेल्या वेळी नव्हती.   

महापालिकाएकूण जागाभाजपशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादीमनसेइतर पक्षअपक्ष
बृहन्मुंबई२२७८२८४३१
ठाणे१३१२३६७३४
पुणे१६२९७१०३९
नागपूर१५११०८२९१०
पिंपरी-चिंचवड१२८७७३६
नाशिक१२२६६३५
कल्याण-डोंबिवली१२०४२५२
औरंगाबाद११५२२२८१०३२१८
वसई-विरार११५१०६
नवी मुंबई१११३८१०५२
सोलापूर१०२४९२११४१४
मीरा-भाईंदर९५६१२२१०
भिवंडी-निजामपूर९०१९१२४७१०
अमरावती८७४५१५१९
मालेगाव८४१३२८२०१३
नांदेड-वाघाळा८१७३
कोल्हापूर८११३२७१५१९
अकोला८०४८१३
उल्हासनगर७८३२२५११
पनवेल७८५१२३
सांगली-मिरज७८४१२०१५
जळगाव७५५७१३
धुळे७४५०
लातूर७०३६३३
अहमदनगर६८१४२४१८
चंद्रपूर६६३६१२
परभणी६५३११८

 

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Elections: BJP Leads, Congress Third in 27 Corporations

Web Summary : In 2015-2018, BJP won most corporation seats (1099), followed by Shiv Sena (489). Congress secured 439, ahead of NCP (294). Regional parties and independents also won seats. BJP dominated in Nagpur, Pune, and Nashik, while Congress led in Nanded and Bhivandi.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस