पनवेलमध्ये पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:22 AM2021-07-19T11:22:20+5:302021-07-19T11:22:26+5:30

पावसाचा जोर वाढल्याने सायन पनवेल महामार्ग,कळंबोली मुंब्रा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.

Heavy rains continue in Panvel; Flooding conditions prevailed in many places | पनवेलमध्ये पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण

पनवेलमध्ये पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण

Next

पनवेल :पनवेल परिसरात दुसऱ्या दिवशी सोमवारी देखील पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.पनवेल शहर,खांदा कॉलनी ,कळंबोली ,खारघर आदींसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.मागील 24 तासात 284 मिमी पावसाची नोंद एकट्या पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील हि सर्वात जास्त पर्यन्यमानाची नोंद आहे.

पावसाचा जोर वाढल्याने सायन पनवेल महामार्ग,कळंबोली मुंब्रा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने गाड्या पाण्यात अडकल्या आहेत.गाढी आणि कासाडी या दोन्ही नद्या दुथडी वाहत आहेत.सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडत आहेत.

Web Title: Heavy rains continue in Panvel; Flooding conditions prevailed in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app