शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनदीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 23, 2015 01:55 IST

उल्हासनगर येथील खेमाणी नाला आणि म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी म्हारळदरम्यान उल्हासनदीत मिसळत आहे.

म्हारळ : उल्हासनगर येथील खेमाणी नाला आणि म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी म्हारळदरम्यान उल्हासनदीत मिसळत आहे. त्यामुळे या नदीपात्रातून पाणीपुरवठा होत असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी व मीरा भार्इंदर या महानगरपालिकांतील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होऊन नदीपात्रातील जलचर संपत्तीवरही परिणाम होत आहे.उल्हासनदी बदलापूर मार्गे कल्याणच्या दिशेला वाहते. तिच्यामुळे कांबा, म्हारळ आणि मोहने परिसरातून स्टेम प्राधिकरण ठाणे, भिवंडी तसेच मीरा भार्इंदर या महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ते पाणी उल्हासनगर, म्हारळ आणि वरप यांना पुरवते. शिवाय एम.जे.पी. कल्याण आणि सेंच्युरी रेयॉन स्वतंत्रपणे पाणी उचलतात. जवळपास १४०४ एमएलडी प्रति दिन पाणी उल्हासनदीतून उचलले जाते. (सध्या ३० टक्के पाणीकपात आहे) मात्र या सर्वांच्या उदंचन केंद्राजवळच उल्हासनगरच्या खेमाणी नाल्याचे तसेच डम्पिंगचे दूषित पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट उल्हासनदीच्या नदीपात्रात मिसळत आहे. त्यामध्ये कचरा, मृत जनावरांचे अवशेष, मानवी मैला असे शरीरास घातक विषारी घटक येत आहेत. यांचा परिणाम नदी पात्रात होऊन शेवाळ आणि जलवनस्पतीचे प्रमाणही खूप वाढते आहे. परिणामी, नदीतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पात्रातील माशांनाही धोका निर्माण झाला आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानेही याआधी एमआयडीसीच्या अंतिम अहवालामध्ये खेमाणी नाला वळवणे तसेच लहान उद्योगधंद्यातील दूषित पाण्यावर (सीइपीटी) शुद्धीकरण प्रक्रिया करूनच ते पाणी पात्रात सोडण्याचे नमूद केले आहे. (वार्ताहर)उच्च न्यायालयाने गठीत केलेली कमिटी याबाबत निर्णय घेत आहे. मात्र उल्हासनगर महानगरपालिकेने जास्त वेळ घालवू नये.- हेमंत कुलकर्णी, उपअभियंता, लघू पाटबंधारे विभाग, कळवाआम्ही नदीपात्रातून १३० एमएलडी पाणी उचलत असून, ते उल्हासनगर, म्हारळ आणि कांबा यांना पुरवत आहोत.- एस.पी. सुरडकर, उपअभियंता, एमआयडीसी, कल्याणयाविषयी उच्च न्यायालयाने सक्त आदेश उल्हासनगर पालिकेस दिले आहेत. आदेशाचे पालन पालिकेने करावे.- डॉ. जी.बी. संगेवार, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळयेत्या ७ ते ८ दिवसांत काम सुरू करू. उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत.- मनोहर हिरे, आयुक्त-उल्हासनगर महानगरपालिका