शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांची सेनेकडून दखल

By admin | Updated: January 8, 2015 01:51 IST

१० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़

मुंबई : भिवंडी महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होऊन आठ वर्षे लोटली तरी ना पदोन्नती, ना पगारवाढ अशी स्थिती असणाऱ्या १० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़महापालिकेच्या सेवेत जून २००७ पासून बी. ई. सिव्हिल व डिप्लोमा इंजिनीअर ही शैक्षणिक पात्रता असणारे एकूण १० कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. आठ वर्षे होऊनही त्यांना कोणतीही पदोन्नती व त्यानुसार पगारवाढ मिळालेली नाही. मात्र याच आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग २’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने दिनांक ५ जानेवारी रोजी सोमवारी वृत्त दिले होते.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज शिवसेना गटनेते दिलीप गुळवी यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग-२’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही वेळोवेळी पात्र कनिष्ठ अभियंत्यांना सुद्धा हेच निकष लावण्यात आले. मात्र २००७ च्या बॅचला वर्ग २च्या पदोन्नती व वेतनवाढीपासून का वंचित ठेवले, असा जाब विचारला आहे. (प्रतिनिधी)