प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:31 AM2019-10-25T00:31:45+5:302019-10-25T00:32:25+5:30

९२ हजारांचे मताधिक्य; १ लाख ७८ हजार ५८१ मतांनी विजयी

Hattrick of BJP Prashant Thakur | प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिक

प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिक

Next

पनवेल : राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. शेकापचे हरेश केणी यांचा त्यांनी पराभव केला. या लढतीत प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. पराभूत उमेदवार हरेश केणी यांना ८६,२११ मते मिळाली आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात यंदा मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाल्याने शेकापच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, मतदानाच्या कमी टक्केवारीचा परिणाम भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना फारसा झालेला दिसून आला नाही.

२५ फेऱ्यांमध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतगणना करण्यात आली. या वेळी पहिल्या फेरीपासूनच ठाकूर आघाडीवर होते. अंतिम २५ फेरीच्या मतमोजणीपर्यंत प्रशांत ठाकूर यांना सुमारे ९२ हजार ३७० एवढे मताधिक्य मिळाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील नोटा व मतदानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. दहा उमेदवारांपैकी नोटाला तिसºया क्रमांकाची १२,३७१ मते मिळाली. सकाळी ८ वाजता व्ही. के. शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली. तत्पूर्वी शेकाप, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसराला गराडा घातला होता.

मतमोजणीच्या फेºया जशा जशा पुढे जात होत्या, तसे भाजपचे मताधिक्य वाढत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पाणी, रस्ते आदी प्रश्नांवर निवडणूक लढवत असलेल्या शेकापला शहरी मतदारांनी स्पष्टपणे नाकारले असले तरी नवखा उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाºया हरेश केणी यांनी सुमारे ८६,२११ मते मिळविली.

शेतकरी कामगार पक्षाकडून अचानक हरेश केणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने त्यांना प्रचारासाठी महिनाभराचाही कालावधी मिळाला नाही. प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धत, दांडगा जनसंपर्क, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या आमदारपदी विराजमान झाले.

विजयानंतर भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल शहरात विजयी रॅली काढण्यात आली. या वेळी शहरात फटाक्याची आतशबाजी तसेच ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. महायुतीला दिलेला कौल लक्षात घेता, मी पनवेलकरांचे आभार व्यक्त करतो. मतदारांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासाला मतदान केले आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरू आहे. त्या घौडदोडीला पनवेलकरांनीही साथ दिली आहे. महायुतीला दिलेला कौल लक्षात घेता, मी पनवेलकरांचे आभार व्यक्त करतो. मतदारांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासाला मतदान केले आहे. त्यांचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरू आहे. त्या घौडदोडीला पनवेलकरांनीही साथ दिली आहे.
- प्रशांत ठाकूर, विजयी उमेदवार, भाजप, पनवेल

Web Title: Hattrick of BJP Prashant Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.