Gutkha of three lakhs seized, two arrested and three absconding in | गुटखाबंदी नावापुरतीच! तीन लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक तर तीन फरार
गुटखाबंदी नावापुरतीच! तीन लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक तर तीन फरार

मधुकर ठाकूर

उरण : उरण शहराच्या आंदनगरमधील एका होलसेल विक्रेत्यांकडून 3 लाख रुपयांचा गुटखा उरण पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून अन्य तीन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उरण वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी दिली. 

उरण शहरात गुटखा विकला जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाने उरण पोलीसात केली होती. या तक्रारीनंतर उरण शहरातील आंदनगरमधील तंबाखूचे होलसेल विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकली असता विमल व महक सिल्व्हर पान मसाला याचा अवैध साठा आढळून आला. सदरच्या मालाची बाजारभावाने किंमत 3 लाख 12 हजार 744 रुपये आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मनोरंजन गिरी व शिवा मुरली अधिक यांना अटक केली असून कल्लू, गुप्ता व कैलास गुप्ता हे तीन आरोपी फरार आहेत. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वपोनि जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कावळे पुढील तपास करीत आहेत. 
 


Web Title: Gutkha of three lakhs seized, two arrested and three absconding in
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.