शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीचा निर्णय अन् सभाही बेकायदेशीर?

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता धारकांना लादण्यात येणाऱ्या करप्रणालीवर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर ठरणार आहे.

पंकज पाटील ल्ल बदलापूरकुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता धारकांना लादण्यात येणाऱ्या करप्रणालीवर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर ठरणार आहे. कारण सभेची वेळ ही दुपारी दोनची असतांना ती दोन वाजता सुरु न करता एक तास आधीच सुरु करण्यात आली. तसेच या सभेत ३४ महत्वपूर्ण विषयांना सभेत मंजुरीही घेण्यात आली. सभेची वेळ दोनची ठरविण्यात आलेली असतांनाही मुख्याधिकाऱ्यांनी ती एक तास आधी म्हणजे १ वाजता कशी सुरु केली हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेची अर्थसंकल्पीय सभा २९ डिसेंबर २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता आयोजिली होती. त्याच दिवशी दुपारी २ वाजता काही महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी दुसऱ्या एका विषेश सभेचे आयोजन केले होते. या सभेत मालमत्तांचे करपात्र मुल्यांमध्ये सुधारणा करण्याचा विषय घेण्यात आला होता. सोबत कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव, जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजना पालिकेच्या ताब्यात घेणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घनकचरा हाताळणी शुल्कात १० टक्के वाढ करणे, उल्हास नदी संवर्धन प्रकल्प हाती घेणे आणि भुयारी गटार योजनेसाठी वाढीव कर्जासाठी मंजूर घेणे या महत्वपूर्ण विषयांसोबत ३४ विषय चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी विषय पत्रिकेत होते. एकाच दिवशी दोन सभा असल्याने नगरसेवकांची संख्याही सभागृहात बऱ्यापैकी होती. योगायोगाने अर्थसंकल्पावरील सभा ही जास्त वेळ न चालल्याने ती सभा दुपारी १ च्या आतच आटोपली. या सभेत अर्थसंकल्प मंजूरही झाला. यानंतर दुपारी २ वाजता ठेवलेल्या विशेष सभेला तासभर थांबावे लागणार म्हणून उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकत्रित निर्णय घेऊन दुपारची सभा एक तास आधीच म्हणजे १ वाजता सुरु केली. ह्या सभेत करपात्र मूल्यांमध्ये सुधाणा करण्याच्या विषयावरच सविस्तर चर्चा करण्यात आली. उर्वरीत सर्व विषयांवर किरकोळ चर्चा करुन ३४ विषय मंजूर करुन दुपारी २ च्या आतच ती आटोपण्यात आली. विशेष सभेची वेळ दोनची असतांनाही ती एक वाजता कशी सुरु करावी याबाबत कोणाही नगरसेवकाने त्यावर अक्षेप घेतला नाही. पालिकेत नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी देविदास पवार यांनीही नगरसेवकांच्या सुरात सूर मिळवित ही सभा सुरु केली. ‘नगरसेवक राजी तो क्या करेगा सीओ काजी ’ अशी अवस्था पवार यांची झाली होती. सभेतील चुकीच्या कामकाजावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिका-यांनी आक्षेप घेणे क्रमप्राप्त होते. मात्र पवार यांनी मूग गिळून बसणे पसंत केले. तर दुसरीकडे स्वत:ला अभ्यासू नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या काही नगरसेवकांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही तर काही नगरसेवकांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. विशेष म्हणेज या बेकायदेशीर सभेत करवाढीचा महत्वपूर्ण निर्णय झाल्याने ही अन्यायकारक कर प्रणाली रद्द व्हावी यासाठी पालिकेची ही सभाच बेकायदेशिर ठरविण्यासाठी शहरातील काही नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे काही नगरसेवकांनी नाव न सांगण्याचा अटीवर स्पष्ट केले. या संदर्भात मुख्याधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पाची सभा लवकर संपल्याने दुसरी सभा एक तास आधी सुरु करण्यात आली. कोणत्या नगरसेवकाची तक्रार आली असती तर या सभेसंदर्भात आपण योग्य ती कार्यवाही केली असती.