शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

कोथिंबिरीसह पालेभाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर; भाजीपाल्याची आवक आली निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:37 AM

मुंबईत प्रतिदिन ६५० ते ७०० ट्रक, टेंपोमधून भाजीपाल्याची आवक होते. दररोज जवळपास साडेतीन हजार टन भाजीपाला आणि ६ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवश्यकता असते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मंगळवारी निम्म्यावर आली. किरकोळ मार्केटमध्ये  कोथिंबिर जुडी ८० तर कांदा ६० रुपयांवर पोहचला आहे. पालेभाज्यांचा आकार लहान झाला असून एक जुडीसाठी २५ ते ३५ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत प्रतिदिन ६५० ते ७०० ट्रक, टेंपोमधून भाजीपाल्याची आवक होते. दररोज जवळपास साडेतीन हजार टन भाजीपाला आणि ६ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवश्यकता असते. परंतु मंगळवारी ५९५ वाहनांद्वारे केवळ साडेचार लाख जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे.घाऊक बाजारात कोथिंबिरी जुडी ३५ ते ६० रुपये व किरकोळ बाजारात ८० रुपयांनी विकली जात आहे. घाऊक बाजारात मेथी १५ ते ३०, पालक १० ते ३०, शेपू १० ते १८ रुपये जुडी दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात या जुडीचे दोन किंवा तीन भाग करून २५ ते ३५ रुपये दराने  विकल्या जात आहे. कांदा ६० रुपये दराने विकला जात आहे.  राज्यात झालेला अवकाळी पाऊस व नंतर सुरू झालेल्या ऑक्टोबर हीट यामुळे आवक कमी होऊन दर वाढू लागले आहेत. पुढील पूर्ण आठवडा मार्केटमधील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालेभाज्यांच्या जुडीचा आकार झाला कमीमहागाईमुळे पालेभाज्यांच्या जुडीचा आकार कमी होऊ लागला आहे. घाऊक बाजारातच प्रतिजुडी १५ ते ३० रुपये दर द्यावा लागत आहे. कोथिंबिरीची जुडी घाऊक बाजारात  ३५ ते ६० रुपयांवर गेली आहे. यामुळे किरकोळ विक्रेते घाऊक बाजारातील जुडीचे दोन किंवा तीन भाग करून  त्याची विक्री करत आहेत.