शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

दादर वाचविणाऱ्या जवानाप्रति सरकारची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:26 PM

२८ वर्षे दखल नाही : १९९३च्या बॉम्बस्फोटात मोलाची कामगिरी

ठळक मुद्दे१२ मार्चला १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी मुंबईत सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते व त्यानंतरही अनेक दिवस संशयास्पद वस्तू आढळत होत्या.

सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दादरचा बॉम्ब निकामी करणारे जवान अद्यापही केंद्र व राज्य सरकारपासून दुर्लक्षित आहेत. स्कूटरमध्ये ठेवलेला १२ किलो आरडीएक्सचा बॉम्ब निकामी करून त्यांनी दादरमधील शेकडो जीव वाचवले होते. मात्र त्यांच्या शिफारशीवरून सहा अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देणाऱ्या सरकारने त्यांनाच उपेक्षित ठेवले आहे.१२ मार्चला १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी मुंबईत सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते व त्यानंतरही अनेक दिवस संशयास्पद वस्तू आढळत होत्या. याचदरम्यान १४ मार्चला दादर येथे उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये १२ किलो आरडीएक्स आढळून आले होते.

दहशतवाद्यांनी मुंबईत पेरलेल्या बॉम्बपैकी तो तेरावा बॉम्ब होता. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी मुंबई विमानतळाच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाला बोलावण्यात आले होते. यावेळी पथकाचे प्रमुख मेजर वसंत जाधव यांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर हा बॉम्ब निकामी करून परिसरातल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवले होते. यावेळी नागरिकांनी अक्षरश: त्यांना खांद्यावर उचलून घेतले होते. या साखळी बॉम्बस्फोटातील पहिला बॉम्ब वरळी येथे आढळला होता. परंतु तो निकामी करण्यासाठी जाधव यांचे पथक जात असतानाच त्याचा भीषण स्फोट झाला. यात जाधव व त्यांचे सहकारी जखमी झाले असता काही क्षणातच मुंबईत इतर ठिकाणीदेखील बॉम्बचे धमाके झाले. यामुळे विमानतळाची सुरक्षा महत्त्वाची असल्याने ते पथकासह परत विमानतळाकडे येत होते. दरम्यान, गजबजलेल्या कोळीवाडा येथे रस्त्यावरच एक हॅन्ड ग्रॅनाईट फेकला असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी त्यांनी क्षणाची विलंब न लावता तो हॅन्ड ग्रॅनाईट त्या ठिकाणावरून माहीम समुद्रकिनारी नेऊन निकामी केला. सैन्यातून निवृत्त होऊन विमानतळाच्या बॉम्बशोधक पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतलेल्या मेजर जाधव यांच्या या दोन्ही कामगिरीमुळे जीवितहानी टळली.

मेजर जाधव यांच्या शिफारशीवरून त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा राज्य व केंद्र सरकारने योग्य तो सन्मान केला. त्यांना केंद्र व त्यांच्या राज्याने आजीवन पेन्शन सुरू केली आहे. मात्र जाधव यांची दखल ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने घेतली. घटनेच्या २८ वर्षांनंतरदेखील ते राज्य व केंद्र सरकारकडून योग्य सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्याने केले दुर्लक्ष

१२ मार्च १९९३ ला मुंबईत स्फोट होऊ लागले असता आमच्या पथकाने मुंबईच्या मदतीसाठी धाव घेतली होती. किमान तीन महिने ठिकठिकाणी आढळणाऱ्या बॉम्बसदृश वस्तू व बॉम्ब निकामी केले. परंतु सहा आठवडे आगोदरच सैन्यातून निवृत्त झालो असल्याने ना सैन्याने कार्याची दखल घेतली. तर केंद्राच्या सूचनेवरून राज्याच्या मदतीला धावूनही केंद्राने दखल घेतली नाही. तर पोलीस दलाचा घटक नसल्याने राज्याने दुर्लक्षित केले.    - मेजर वसंत जाधव (निवृत्त)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSoldierसैनिक