नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा गौतम अदानी यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:55 IST2025-03-17T11:54:53+5:302025-03-17T11:55:04+5:30
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या भागीदारीतून विमानतळ उभारणी केली जात आहे...

नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा गौतम अदानी यांनी घेतला आढावा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जून २०२५ मध्ये पहिल्या व्यावसायिक विमानाचे उड्डाण होईल, असे आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत होत आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या भागीदारीतून विमानतळ उभारणी केली जात आहे.
दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या क्षेत्रातील दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी डॉ. प्रीती अदानी, जीत अदानी आणि दिवा अदानी, अरुण बन्सल, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा आदींसह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.