ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:28 IST2023-10-30T17:26:49+5:302023-10-30T17:28:34+5:30
ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग
उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पातुन नाल्यावाटे बाहेर आलेल्या ऑईलला आग लागली. ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पातुन कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ऑईल नाल्यातून बाहेर पडले. ओएनजीसीच्या पीरवाडी बीचवरील हेलिपॅड शेजारील नाल्याशेजारील जमा झालेल्या कचऱ्यात हे ऑईल मिसळले.त्यामुळे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.धुराचे लोट दिसू लागताच ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग तत्काळ आटोक्यात आणली.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र ओएनजीसी नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली असता प्रकल्पातुन नाल्यावाटे कोणत्याही प्रकारचे ऑईल बाहेर पडलेले नाही.हेलिपॅडच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या बाजूला जमा झालेल्या कचऱ्याला किरकोळ आग लागली होती.
ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आटोक्यात आणली असल्याचे ओएनजीसी नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.