शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ

By नारायण जाधव | Updated: January 19, 2026 08:56 IST

१९९५ पासून पहिल्यांदाच  पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत

नारायण जाधव

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष कोणताही असो, सतत २० वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यावेळी तर १११ पैकी ६५ नगरसेवक निवडून एकहाती सत्ता सोपविली आहे. यापूर्वी सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी नाईकांना इतरांच्या कुबड्यांची गरज भासत होती. कधी काँग्रेस तर कधी अपक्षांची मदत घेऊन आपणच नवी मुंबईचे दादा आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईचे कसे नुकसान केले, हा मुद्दा त्यांनी प्रचारात मांडला. सत्ता पुन्हा हाती दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण हे सर्व थांबवू, असे आश्वासन दिले. ते लोकांना भावले. आता एकहाती सत्ता आल्याने महापालिकाच नव्हे तर सिडकोसह एमआयडीसीत नाईक काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असेल.

एकनाथ शिंदेंविरोधात अचानक आक्रमक पवित्रा का घेतला, हे वनमंत्री नाईकांनी प्रचारात सांगितले होते. पाच वर्षांपासून नवी मुंबईत प्रशासकीय राजवट आहे. त्या आधी नाईक  सत्तेबाहेर असल्याने या महापालिकेवर आधी नगरविकासमंत्री, नंतर मुख्यमंंत्री आणि पुन्हा नगरविकासमंत्री म्हणून शिंदेंनी हुकूमत गाजविली. यातूनच मर्जीतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणून पात्रता नसताना हवा तो पदभार देऊन त्यांच्याकडून पाहिजे तशी कामे करवून घेणे, नको त्या कामांची कंत्राटे काढणे, नगररचना खात्याकडून पाहिजे तसे निर्णय घेऊन बिल्डरांचे चांगभलं करणे, नवी मुंबईचे पाणी इतरांना देणे,  आरक्षित भूखंड सिडको आणि एमआयडीसीकडून विकणे असे आरोपही त्यांनी केले. महापालिकेत भाजपची सत्ता असताना आणि आमदार असतानाही अधिकारी नाईकांना जुमानत नव्हते. यातूनच मग नाईक आणि शिंदेंमधील दरी वाढली.

आता नाईक मंत्री आहेत.  महापालिकेत पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. निर्णयाच्या चाव्या महासभेच्या हाती गेल्या आहेत. यामुळे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे अथवा आयुक्तांना आता महासभेच्या मंजुरीशिवाय निर्णय घेता येणार नाहीत. निवडणूक प्रचारात नाईक यांनी आक्रमकपणे प्रचार केला. नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेंनी यूडीसीपीआरमध्ये बिल्डरधार्जिणे बदल केलेे, आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली, कोणी दलाली खाल्ली असे बेछूट आरोप केले. 

महापालिकेत सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शहरांना भकास करणारे यूडीसीपीआरमध्ये केलेले बिल्डरधार्जिणे बदल थांबवू, प्रशासकीय राजवटीतील निर्णयांचे ऑडिट करण्यासह ईडीमार्फत चौकशी करू असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होण्याचे संकेत भाजपच्या पहिल्याच विजयी मेळाव्यात मिळाले आहेत. १९९५ पासून पहिल्यांदाच  पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत. यूडीसीपीआरबाबत नाईक यांचे म्हणणे खरे असून मी  मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेईन व शहर विकासासाठी त्यात योग्य बदल केले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याने महापालिकेच्या नगररचनाकारांसह इतरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात नवी मुंबईत ‘भाई’गिरी कमी होऊन ‘दादा’गिरी चालेल असे दिसते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Naik's Power Resurges in Navi Mumbai Municipal Elections

Web Summary : Ganesh Naik regains control in Navi Mumbai after winning the municipal elections. Naik criticized Eknath Shinde's policies, promising to reverse builder-friendly changes. With BJP's support, significant changes in city planning are expected, shifting power dynamics within Navi Mumbai.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ganesh Naikगणेश नाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस