शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पाम टॉवरमध्ये एफएसआय घोटाळा? सिडकोचे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:50 AM

नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे चेअरमन (ट्रस्टी) अतुल अग्रवाल यांनी केली आहे.

नवी मुंबई  - नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे चेअरमन (ट्रस्टी) अतुल अग्रवाल यांनी केली आहे. त्या संबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे व राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे.सोसायटी प्लॉट अंतर्गत सिडकोने आयडीबीआय बँकेच्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी ११ मार्च २००३ रोजी नेरु ळ सेक्टर-४२ ए येथील प्लॉट नं. ११ हा सुमारे १२१०० चौ.मी.चा भूखंड पाम टॉवर को.आॅ.हौ. सोसायटीलावाटप केला होता. या भूखंडावरबँकेचे अधिकारी आणि वर्ग-३ ववर्ग-४ कर्मचाºयांकरिता स्वतंत्र सोसायटी निर्माण करण्यासाठी ६०:४० प्रमाणे भूखंडाचे विभाजन करण्यात आले.दरम्यानच्या काळात पाम टॉवर सोसायटीने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी सिडकोकडे ०.५ अतिरिक्त चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सदर चटईक्षेत्र मंजूर करताना सिडकोने ५९ हजार ८५० रु पये प्रतिचौ. मीटर दराने एकूण ३६३० चौ. मी. क्षेत्रफळाचे २२ कोटी रु पये भरण्यास सांगितले; परंतु सोसायटीने अतिरिक्त चटई क्षेत्राची संपूर्ण रक्कम भरण्याअगोदरच सदर वाढीव चटईक्षेत्र मे. डीबीएस कन्सल्टन्सी प्रा. लि. या त्रयस्त कंपनीला हस्तांतरित करून त्यांच्यासोबत करारनामा केला. यामुळे सिडकोच्या सोसायटी प्लॉट योजनेच्या अटी-शर्तीचा भंग झाला असून, सिडकोकडून राखीव किमतीत ०.५ चटईक्षेत्र घेऊन त्याची त्रयस्त कंपनीला बाजारभावाने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून उघडकीस आला आहे.सिडकोने मंजूर केलेल्या ३६३० चौ.मी. क्षेत्रफळाची बाजार भावानुसार किमान किंमत ७५ कोटींहून अधिक होते; परंतु पाम टॉवर सोसायटीला सुमारे २२ कोटी रु पये सिडकोला भरायचे होते. एकूणच नियमबाह्यरीत्या त्रयस्त कंपनीला चटईक्षेत्र हस्तांतरित करून, सोसायटीने सिडकोचे करोडोंचे नुकसान केल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. या एफएसआय घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.दरम्यान, या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली आहे. तसेच या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रे शासनाने सिडकोकडून मागविल्याचे पत्र सिडकोच्या वसाहतविभागास बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहे.तक्रारीबाबत चौकशी सुरूसोसायटी प्लॉटचे चटईक्षेत्र त्रयस्त कंपनीला हस्तांतर करण्याची कुठलीही तरतूद सिडकोच्या नियमात नाही. सोसायटी प्लॉटला दिलेले अतिरिक्त चटईक्षेत्र हे आयडीबीआय बँकेच्या अधिकारी, कर्मचाºयांसाठीच वापरणे सोसायटीला बंधनकारक असल्याचे सिडकोचे वसाहत व्यवस्थापक (वसाहत-१) फय्याज खान यांनी स्पष्ट केले आहे. अतुल अग्रवाल यांची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.नियमाचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. सोसायटीने नियमानुसार कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एफएसआय हस्तांतरित करण्याचा प्रश्न नाही. तक्रारदाराकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार होत आहे. - के. डी. होडावडेकरमाजी अध्यक्ष : पाम टॉवर कॉ.आॅप. हाउसिंग सोसायटी

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार