शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

लघुशंकेसाठी थांबलेल्यांना मारहाण करून चौघांनी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 11:31 PM

सानपाडा येथील घटना : रस्त्यावर लुटारूंच्या टोळ्यांचा वावर

नवी मुंबई : मासे आणण्यासाठी पनवेल येथून कुलाब्याला चालेल्या तिघांना मारहाण करून लुटल्याची घटना गुरुवारी सानपाडा येथील पुलाखाली घडली आहे. रस्त्यात कार थांबवून दोघेजण लघुशंकेसाठी खाली उतरले असता, हा प्रकार घडला. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नंदकुमार दाते यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. दाते हा अमोल गाढवे व अजिंक्य यांच्यासोबत कारने कुलाबा येथे मासे आणण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास चालले होते. या सर्वांचा मासेविक्रीचा व्यवसाय असून, ते नियमित या मार्गाने जात असतात. गुरुवारी पहाटे ते पनवेल येथून कुलाब्याला कारने जात असताना, सानपाडा पुलाजवळ त्यांनी लघुशंका करण्यासाठी कार थांबवली होती. यावेळी नंदकुमार व अमोल हे दोघे कारमधून खाली उतरले असता, पाठीमागून रिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करत लुटायला सुरुवात केली. यावेळी अजिंक्यला जाग आली असता, त्याने मित्रांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने अजिंक्यने त्यांच्या रिक्षाची चावी काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्यांच्यापुढे हार पत्करली. या जबरी लुटीमध्ये तिघेही जखमी झाले असून, त्यांचा मोबाइल व रोख रक्कम चोरीला गेली आहे. या घटनेनंतर त्यांनी तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली असता, अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर त्यांनी रिक्षाचा नंबर पोलिसांना कळवला असून, त्याद्वारे पोलीस शोध घेत आहेत.मारण्यास सुरुवात केल्याने अजिंक्यने त्यांच्या रिक्षाची चावी काढून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लुटारूंनी रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने त्यांनी त्यांच्यापुढे हार पत्करली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस