भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 21:39 IST2025-09-19T21:38:44+5:302025-09-19T21:39:01+5:30
हरेश केणी यांनी 2019 साली शेकापच्या वतीने प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
पनवेल: भाजप मध्ये नाराज असलेले माजी नगरसेवक हरेश केणी यांनी अखेर कॉग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.19 रोजी केणी यांनी प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका जयश्री म्हात्रे यांचे पती रविकांत म्हात्रे आणि भाजप कार्यकर्ते कैलास घरत यांनी देखील प्रवेश केला आहे.
हरेश केणी यांनी 2019 साली शेकापच्या वतीने प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर पक्षाने विरोधीपक्ष नेते पदावरून डावलल्याने भाजपात प्रवेश केला होता. मात्र नागरी प्रश्न सोडविण्यास भाजप अपयशी ठरत असल्याचे सांगत केणी यांनी भाजपाला रामराम करीत कॉग्रेसचा हात धरला आहे.यावेळी कॉग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान साहेब, खासदार चंद्रकांतजी हांडोरे,प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,नौफील सैय्यद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.