नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे; पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:03 IST2026-03-27T12:03:19+5:302026-03-27T12:03:19+5:30

या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडणार आहे.

flights to 46 cities from navi mumbai airport first summer schedule announced | नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे; पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा

नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे; पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून, २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ४६ शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडणार आहे.

नव्या वेळापत्रकात ३० नवीन मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना देशातील प्रमुख शहरांमध्ये अधिक वेगवान आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः दिल्ली, गोवा, बेंगळुरू आणि कोचिन या शहरांसाठी सर्वाधिक उड्डाणे नियोजित आहेत. याशिवाय हैद्राबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित सेवा मिळणार आहे. या विस्तारासाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत.

आठवड्याला १,०९२ उड्डाणे

उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर विमानतळावरील उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. आठवड्याला सुमारे १,०९२ उड्डाणे अपेक्षित असून, दररोज सरासरी १५६ उड्डाणे होतील.

सुरुवातीला दररोज २२ उड्डाणांपासून सुरू झालेली सेवा एप्रिल २०२६ पर्यंत वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता आणि प्रवासी हाताळण्याची क्षमता अधिक बळकट होईल. टियर-१ आणि टियर-२ शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी वाढल्याने उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

२९ मार्च ते २४ ऑक्टोबर दरम्यानचे वेळापत्रकाची वैशिष्ट्ये : ४६ शहरांसाठी थेट उड्डाणे, ३० नवीन मार्गाचा समावेश, १५६ दररोज सरासरी उड्डाणे, १,०९२ आठवड्याला उड्डाणे
 

Web Title : नवी मुंबई हवाई अड्डे से 46 शहरों के लिए उड़ानें: ग्रीष्मकालीन समय-सारणी घोषित

Web Summary : नवी मुंबई हवाई अड्डे की पहली ग्रीष्मकालीन समय-सारणी में 29 मार्च से 46 शहरों के लिए उड़ानें शुरू। 30 नए मार्गों, 1,092 साप्ताहिक उड़ानों के साथ, यह क्षेत्र में कनेक्टिविटी को बढ़ावा देगा और व्यापार-पर्यटन को लाभान्वित करेगा।

Web Title : Navi Mumbai Airport Announces Flights to 46 Cities: Summer Schedule

Web Summary : Navi Mumbai Airport's first summer schedule offers flights to 46 cities, starting March 29th. The schedule includes 30 new routes, with 1,092 weekly flights, benefiting connectivity and boosting business and tourism in the region.