कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

By कमलाकर कांबळे | Published: January 26, 2024 03:06 PM2024-01-26T15:06:17+5:302024-01-26T15:06:52+5:30

यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

Flag Hoisting by Konkan Divisional Commissioner Mahendra Kalyankar | कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी मुंबई: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त  कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण  कोकण विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदानात   हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  परेड कमांडर गजानन राठोड (सहा.पोलीस आयुक्त तर्भे), शांताराम वाघमोडे (राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय नवी मुंबई ),  आर.सी.पी.पथक, नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस  पथक,  नवी मुंबई वाहतूक  पोलीस  पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या कार्यक्रम प्रसंगी देशाच्या सीमेवर आहोरात्र सज्ज अशा सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘थल सेना दिवस (आर्मी डे)’  निमित्त आयोजित रक्तदान शिबीर केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाच शाळातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे  सादरीकरण केले. यात टोपली कवायत, महाराष्ट्र दर्शन, देशभक्तीपर गीत, कवायत, लेझीम नृत्य आदीं कार्यक्रमांचा समावेश होता.

या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय कोकण विभाग आयुक्त विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) (रोहयो) अजित साखरे, उपायुक्त (विकास आस्थापना) मिनल कुटे, उपायुक्त (पुर्नवसन) अमोल यादव, उपायुक्त (पुरवठा) लिलाधर दुफारे, उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, सेवाकर उपायुक्त कमलेश नागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.

Web Title: Flag Hoisting by Konkan Divisional Commissioner Mahendra Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.