शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

पनवेल महापालिकेच्या नऊपैकी पाच महासभा तहकूब, वेळेसह पैशाचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:59 AM

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत.

- वैभव गायकरपनवेल  - पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत. मात्र, या महासभेत कामकाज चालण्याऐवजी विविध कारणांनी सभा तहकूब होण्याचे प्रमाणच जास्त असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत पार पडणाऱ्या नऊ महासभांपैकी पाच सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.पनवेल महानगरपालिकेला स्वंतत्र असे सभागृह नसल्याने पालिकेच्या मासिक महासभा येथील फडके नाट्यगृहात पार पडत असतात. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग सादर केले जात असल्याने या ठिकाणी महासभेचे आयोजन करण्यापूर्वी नाटकांच्या बुकिंगची माहिती पालिकेला घ्यावी लागते. काही वेळेला नाटकांच्या प्रयोगामुळे महासभेच्या तारखाच रद्द करण्याचे प्रकार या ठिकाणी घडले आहेत. अशा वेळी सभा तहकूब करण्याचे प्रकार वाढत असतील तर यामुळे पालिकेसह लोकप्रतिनिधींचेही मोठे नुकसान होत आहे. सभेचे कामकाम पूर्ण दिवसभर चालत असल्याने त्या दिवशी कोणत्याही नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन पालिकेला करता येत नाही. विशेष म्हणजे, या दिवशी सर्व नगरसेवक, पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी सभागृहात हजर राहत असतात. प्रत्येक प्रभागातील समस्या, अडचणी, विविध प्रस्ताव, ठराव आदीवर या महासभेत संक्षिप्त चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, विविध कारणांमुळे सभा तहकूब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होताना दिसून येत आहे. प्रत्येक महासभेला जेवण, नाश्ता आदीची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात येत असते. हा खर्चही लाखोंमध्ये आहे. वारंवार सभा तहकूब केल्याने अतिरिक्त खर्चावर वाढही होत असते.पनवेल महानगरपालिका नवीन असल्याने पालिकेच्या कामकाजावर अभ्यासपूर्ण चर्चा होणे गरजेचे आहे. गोंधळामुळे अशाप्रकारची सभा क्वचितच पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळत नसल्याने त्यांच्यामध्येही नाराजीचा सूर उमटत असतो.पहिल्यांदा निवडून सभागृहात आलेल्या नगरसेवकांना सभेचे कामकाज कसे चालते, याबाबत आदर्श घालून देण्याऐवजी आपापसातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे प्रकारच सभागृहात मोठ्या प्रमाणात घडत असतात. पनवेल महानगरपालिकेच्या अद्याप नऊ महासभा पार पडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पाच विशेष सभाही पार पडलेल्या आहेत.तहकूब सभांची माहितीतहकूब महासभा पुढील तारीख१८/११/२०१७ २२/११/२०१७२०/०१/२०१८ २३/०१/२०१८१७/०२/२०१८ २१/०२/२०१८१९/०३/२०१८ २२/०३/२०१८२६/०३/२०१८गोंधळामुळे नाईलाजास्तव महासभा तहकूब कराव्या लागतात. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, यासंदर्भात काळजी घेतली जाईल.- डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महापालिकाआयुक्त अनुपस्थित असल्याचे कारण पुढे करीत, सभा तहकूब केल्या जातात. मात्र, तहकूब महासभा आयुक्तांच्या अनुपस्थितीत चालविली जाते. सत्ताधाºयांमार्फत जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते,पनवेल महापालिकासत्ताधारी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्यात मश्गूल असतात. विशेष म्हणजे, पीठासन अधिकारी, महापौरच नगरसेवकांमध्ये भेदभाव करीत असतात. केवळ गोंधळ सदृश स्थिती असल्यानेच विकास खुंटला आहे.- सतीश पाटील, नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

टॅग्स :panvelपनवेलnewsबातम्या