किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:16 IST2021-02-12T20:16:17+5:302021-02-12T20:16:56+5:30
Fire in Hotel : शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात
ठळक मुद्देआगीत पूर्ण हॉटेल जळून खाक झाले असून थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
नवी मुंबई - गोठीवली येथील रेड चिली हॉटेलमध्येआग लागल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक झाले असून थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोठीवली येथील यशोदीप हाईट्स इमारतीमधील रेड चिली हॉटेलमध्ये हि दुर्घटना घडली. हॉटेलच्या किचनमध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर आग सर्वत्र पसरली असता काही वेळातच संपूर्ण हॉटेल जळू लागले. आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने लगतच्या इतर दुकानांचा व इमारतीचा धोका टळला. अन्यथा आग अधिक पसरून मोठ्या हानीची शक्यता होती.