रबाळेतील ‘त्या’ कंपनीला पुन्हा आग

By Admin | Updated: December 22, 2016 06:41 IST2016-12-22T06:41:51+5:302016-12-22T06:41:51+5:30

रबाळे येथील अनब्रेको कंपनीला आग लागल्याची घटना घडली. सदर कंपनीला यापूर्वी देखील अनेकदा आग लागलेली आहे.

Fire in the company of Rabale | रबाळेतील ‘त्या’ कंपनीला पुन्हा आग

रबाळेतील ‘त्या’ कंपनीला पुन्हा आग

नवी मुंबई : रबाळे येथील अनब्रेको कंपनीला आग लागल्याची घटना घडली. सदर कंपनीला यापूर्वी देखील अनेकदा आग लागलेली आहे. यामुळे त्याठिकाणी घडणाऱ्या आगीच्या घटनांबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास अनब्रेको कंपनीच्या आवारातील साहित्याला आग लागली. अनेक महिन्यांपासून ही कंपनी बंद स्थितीत आहे. यादरम्यान चारहून अधिक वेळा त्याठिकाणी आग लागण्याच्या
घटना घडलेल्या आहेत. मात्र आगीचे ठोस कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात साहित्य पडलेले असून त्याला सातत्याने आग लागत आहे. बुधवारी दुपारी देखील त्याठिकाणी आग लागताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. (प्रतिनिधी)

Web Title: Fire in the company of Rabale