Fire at the Commodity Exchange building in APMC | एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग

एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज इमारतीला आग

ठळक मुद्देशनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते.

नवी मुंबई - एपीएमसी मधील कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बंद कार्यालयात हि आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. इमारत सध्या बंद असल्याने तिथल्या कार्यालयात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र, आग अधिक भडकल्याने पाचव्या मजल्यावरील कार्यालये जळून खाक झाली आहेत. मात्र आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. सुमार एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या ज्या विंग मध्ये हि आग लागली त्याठिकाणी 150 हुन अधिक कार्यालये आहेत. त्यामुळे आग अधिक पसरली असती तर मोठी हानी झाली असती.

Web Title: Fire at the Commodity Exchange building in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.