अखेर आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT ने सुरू केले १६५ बसचे 'सुरक्षा ऑडिट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:42 IST2025-06-06T10:41:23+5:302025-06-06T10:42:10+5:30

बसला आग लागण्याची एकही घटना यापुढे घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Finally NMMT starts 'safety audit' of 165 buses to prevent fire incidents | अखेर आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT ने सुरू केले १६५ बसचे 'सुरक्षा ऑडिट'

अखेर आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT ने सुरू केले १६५ बसचे 'सुरक्षा ऑडिट'

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी एनएमएमटी प्रशासनाने सर्व १६५ इलेक्ट्रिक बसचे सुरक्षा ऑडिट सुरू केले. संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस मार्गस्थ करण्यास सुरुवात केली.एनएमएमटीच्या घणसोली आगारात बुधवारी ४ बस खाक झाल्या होत्या. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी जेबीएम कंपनीच्या सर्व बसची तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. गुुरुवारी रात्री ११४ बसची  तपासणी केली. कंपनीने बस ओके असल्याचा अहवाल दिल्यानंतरच त्या मार्गस्थ करण्यात आल्या.

प्रवाशांचे झाले हाल

बसला आग लागण्याची एकही घटना यापुढे घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनी व्यवस्थापनाकडेच बसच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून एनएमएमटी व्यवस्थापन प्रत्येक बसचे सुरक्षा ऑडिट करून घेत आहे.  ऑडिटमुळे दिवसभर बस कमी धावल्याने प्रवाशांचे  हाल झाले.

Web Title: Finally NMMT starts 'safety audit' of 165 buses to prevent fire incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.