शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कल्याण-कर्जत महामार्ग १०० फुटी

By admin | Updated: November 28, 2015 01:12 IST

शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत

उल्हासनगर : शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत. बाधितांना पर्यायी जागा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली असून शासनाच्या निर्णयाने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. उल्हासनगरच्या मधोमध कल्याण-कर्जत महामार्ग जात असून रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीएने हाती घेतले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी ५० ते ६० फूट असल्याने वाहतूककोंडी नेहमीची झाली आहे. यामुळे हे रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र, १०० फुटी रस्ता रुंदीकरणाचा फटका ८२१ दुकानांसह तीन रहिवासी इमारतींना बसत आहे. रस्ता १०० ऐवजी ८० फुटी करण्याची मागणी स्थानिक राजकीय पक्षांसह व्यापाऱ्यांनी शासनासह मुख्यमंत्र्यांकडे केली. तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी भविष्यातील विचार करता रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण कसे आवश्यक आहे, याची टिप्पणी शासनासह मुख्यमंत्र्यांना दिली होती. गेल्या ३ वर्षांपासून रस्त्याचे भिजत घोंगडे असून रस्ता बांधकाम करण्याची मुदत ३१ मार्च २०१५ रोजी संपली आहे. रस्त्याची मुदत संपल्याने एमएमआरडीएवर पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. पालिकेने बाधित दुकानांना नोटिसा दिल्या असून कारवाईचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले आहेत.महापालिकेने बाधित व्यापाऱ्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच स्थानिक राजकीय पक्षांनी १०० ऐवजी ८० फूट रस्ता रुंदीकरण करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून शासनाला पाठविला होता. ठराव विखंडित करून रस्ता १०० फुटी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांत नाराजी पसरली असून मुख्यमंत्र्यांना पुन्हा साकडे घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)