शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

अखेर गणेश नाईकांचे पक्षांतर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 7:29 PM

गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिकेवरही कमळ फुलणार आहे.

नवी मुंबई - राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कमळ हाती घेतले. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती. अखेर, आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून नाईक हे भाजपवासी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा पक्षांतर सोहळा पार पडला. 

गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिकेवरही कमळ फुलणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वतंत्र गटाची नोंदणी केली. प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी शहरात मोठमोठे बॅनर लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या सोबत फलक व बॅनरवर गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांची छायाचित्रे झळकत आहेत. काही फलकांवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील व जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या स्थानिक नेत्यांनाही स्थान दिले आहे. नवी मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील नाईक समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी भाजपत दाखल होणार आहेत. या प्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून नाईक हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा