शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उभारलाय एक लढा...‘पणती’ तेवत ठेवण्यासाठी

By admin | Updated: November 18, 2016 03:13 IST

ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत.

पंकज रोडेकर / ठाणेप्रेमाने जग जिंकता येते, असे कोणीतरी म्हटले आहे. या उपदेशातून ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत. त्यातूनच वंश चालवायला मुलगाच हवा, असे नाहीतर मुलगी तितकी महत्त्वाची आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून मुलगा आणि मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यासाठी सासू आणि सुनांनी हा लढादेखील लढण्याचे ठरवले आहे.ठाणे जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील स्तनदा माता, गरोदर माता आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी काम करताना शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यातच, दुर्गम भागातील महिला आणि बालकांना हा विभाग आरोग्याच्या सुविधांसह त्यांच्या प्रबोधनाचे काम करतो. कुपोषणावर मात करता यावी, हा या विभागाचा हेतू आहे. त्यामुळे या विभागाने वर्षभरात आदिवासी गावपाड्यांतील गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अनेक शिबिरे घेऊन त्यांच्यात जनजागृतीचे काम केले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये गरोदर आणि स्तनदा मातांच्या बाबतीत बरेचसे निर्णय घरातील मोठी व्यक्ती म्हणजे सासूमार्फत घेतले जातात. कुटुंबात सासूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे मातेच्या आणि बालकाच्या आरोग्याबाबत सासू आणि सून यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत मेळावे घेतले जातात. एवढेच नव्हे तर मेळाव्यात आत्मसात केलेले विचार इतरांनाही सांगणार असल्याचे कबूल केले आहे.