शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास पतसंस्थांचा कारभार ठप्प!

By admin | Updated: November 18, 2016 02:24 IST

सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने वसई तालुक्यातील पन्नासहून अधिक पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

शशी करपे/ वसईसरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने वसई तालुक्यातील पन्नासहून अधिक पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पतसंस्थांच्या ठेवी बँकांमध्ये जमा असल्या तरी बँकांकडून दिवसाला फक्त दहा हजार रुपयेच दिले जात असल्याने सभासद आणि ग्राहकांना दररोज पैसे देता येत नसल्याने सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे पतसंस्थांवरील विश्वास उडून त्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती संचालक व्यक्त करीत आहेत. वसई तालुक्यात साधना, कल्पतरू, कॅम्पेनिन, माणिकपूर अर्बन, गार्सिन, सेंट घोन्सालो, जीवन विकास, आगाशी प्रगती, वसई प्रगती, एकता यांच्यासह लहान-मोठ्या मिळून सुमारे पन्नासहून अधिक पतसंस्था आहेत. प्रत्येक गावात आणि शहरात प्रत्येक पतसंस्थांच्या शाखाही आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषत: ख्रिस्ती आणि आगरी समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून पतसंस्था कार्यरत आहेत. पश्चिम पट्ट्यातील हजारो लोक आजही पतसंस्थांवर अवलंबून आहेत. म्हणूनच या पतसंस्थांचे सभासद आणि ग्राहक मिळून सुमारे पाच लाखाच्या घरात ठेवीदार आहेत. दरम्यान, नव्या धोरणामुळे पतसंस्थांकडून ठेवी स्वीकारणे बंद झाले आहे. लोकांना पैसेही परत देता येत नाहीत. महत्वाचे म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे हप्तेही थकू लागले आहेत. पैसे नसल्याने कर्जदार हप्ते देईनासे झाले आहेत. बहुतेक पतसंस्था महावितरणची बिले स्वीकारतात. त्यातूनही आर्थिक लाभ मिळत असतो. ग्राहकांचीही सोय होते. आता बिले स्वीकारणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे.