शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीसाठी राजस्थानच्या दाम्पत्याची खोटी कागदपत्रे

By admin | Updated: January 8, 2015 22:32 IST

कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात.

नांदगाव : कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाद्वारे कोणतीही मोठी जमीन खरेदी करताना विकत घेणारा हा मूळचा शेतकरी असणे आवश्यक आहे. मात्र मूळच्या राजस्थानच्या दाम्पत्याने खोट्या कागदपत्रांच्या जोरावर माणगाव येथे जमीन खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय उधळण्यात आला.नितीनकुमार दिनदयाळ दिडवानिया आणि सुषमादेवी दिनदयाळ दिडवानिया यांनी राजस्थान येथील बाली, ता. पाली येथील शेतकरी असल्याचा खोटा दाखला सादर करून माणगावच्या निळज येथील शेतजमीन खरेदी केली होती. याबाबत विलासराव देशमुख यांच्या तक्रार अर्जावरून कोकण आयुक्तांनी माणगाव तहसीलदार महेश सागर यांना चौकशीचे आदेश दिले होते. माणगाव तहसीलदारांनी राजस्थान येथे चौकशी केली असता हे कुटुंब शेतकरी नसून पुराव्यामध्ये खाडाखोड करून पुरावे सादर केल्याचे कळविले. शेतकरी असल्याचा पुरावा सादर करावा यासाठी दिडवानिया कुटुंबाला तहसीलदार सागर यांनी भरपूर अवधी दिला, परंतु ते तसा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)१तहसीलदार महेश सागर यांनी ९ मे २०१४ माणगावमधील कैझाद श्रॉफ प्रकरणात जमीन सरकारजमा केली होती. त्यांनी हा दुसरा ऐतिहासिक निर्णय देवून आपल्या कार्यकुशलतेची चमक दाखविली आहे. २००९ साली हे प्रकरण माझ्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. २राजस्थान येथील बाली तहसीलदार यांच्याकडून लेखी उत्तर आले की, दिडवानिया कुटुंबाने २००९ चा जो पुरावा सादर केला त्यात खाडाखोड आहे. त्यानंतर त्यांची चौकशी लावली असता पुरेसा अवधी देवूनही ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय दिला.