केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:47 IST2019-08-05T21:45:28+5:302019-08-05T21:47:00+5:30
खारघर भाजपच्या वतीने सोमवारी येथील शिल्प चौकात जल्लोत साजरा करण्यात आला.

केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष
खारघर - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० व ३५ अ रद्द करून केंद्र सरकारने जम्मू - काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिल्याचे विधेयक मंजूर केल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी खारघर भाजपच्या वतीने सोमवारी येथील शिल्प चौकात जल्लोत साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी शिल्प चौकात फटाके फोडण्यात आले. तसेच मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्यात आली. भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक निर्णयाचे महत्व यावेळी नागरिकांना भाजप कार्यकर्त्यांना पटवून देण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, ब्रिजेश पटेल, आर के दिवाकर, मनोज शरबिद्रे,बिना गोगरी,गीता चौधरी, अमर उपाध्याय दीपक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.