शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

सात महिने उलटूनही मनरेगाकडून मजूरी नाही

By admin | Updated: July 25, 2015 22:22 IST

मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही.

मोखाडा : मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. या कारभारामुळे एका मजुराचा पैसे नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून उपचाराअभावी एका कामगाराला पक्षघातामुळे अपंगत्व आले आहे. असे असतानादेखील मनरेगाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटना ३१ जुलै रोजी तहसील पंचायत समिती कार्यालयावर जाब विचारण्यासाठी धडकणार आहे.सातुर्ली येथील ८० कामगारांनी जानेवारी महिन्यात मनरेगाच्या योजनेत काम केले आहे. मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम, अशी या योजनेत तरतूद असतानादेखील ७ महिन्यांचा कालावधी उलटूनही या कामगारांना मजुरी मिळाली नसून तहसील कार्यालय व पंचायत समितीचे उंबरठे झिजवूनसुद्धा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. उपासमारीची वेळ आलेल्या या कामगारांपैकी त्यातच भगवान भाऊ बरफ या कामगाराचा किरकोळ आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर आते, खोच, गोदे बुदु्रक, धोत्याचापाडा येथील गावांतील कामगारांना मजुरी मिळालेली नाही. शिरसगावामधील २६ कामगारांनी पाच महिन्यांपूर्वी ६ दिवस काम केले होते. मात्र, त्यांनाही मजुरी मिळू शकलेली नाही. त्यातील वामन दिवे हा कामगार सध्या पक्षवाताच्या आजाराचा सामना करीत असून अशा या दळभद्री यंत्रणेच्या विरोधात तालुक्यातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांकडून तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. (वार्ताहर)मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरूच असून या कुचकामी यंत्रनेमुळे कामे करूनही तालुक्यातील आदिवासींना मजुरी मिळालेली नाही. अनेकदा ही बाब निदर्शनास आणून दिली असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ३१ जुलै रोजी आंदोलन केले जाणार आहे. - गणेश माळी, तालुकाध्यक्ष मोखाडा