शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला समिती सदस्यपदासाठी निवडणूक

By admin | Updated: December 6, 2015 01:00 IST

सरकारच्या निर्देशानुसार गठीत होणाऱ्या समितीवर जाण्यासाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही प्रक्रिया खर्चिक व अन्यायकारक आहे.

नवी मुंबई : सरकारच्या निर्देशानुसार गठीत होणाऱ्या समितीवर जाण्यासाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही प्रक्रिया खर्चिक व अन्यायकारक आहे. तसेच फेरीवाल्यांना नियोजन समितीपासून दूर ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप नवी मुंबई लेबर युनियनने केला आहे. युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी तशा आशयाचे एक निवेदन नगरविकास विभागाला दिले आहे.शहरातील फेरीवाल्यांचे नियोजन करणे व त्यांना व्यवसाय परवाने देणे यासाठी एक सर्वव्यापी समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने २0१४ मध्ये दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधीला स्थान देण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने स्थापन केलेल्या फेरीवाला समितीवर फेरीवाल्यांच्या सात प्रतिनिधींना स्थान देण्यात आले होते. असे असले तरी ७ आॅक्टोबर २0१५ रोजी काढलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींच्या थेट निवडीला फाटा देण्यात आला आहे. समितीवर येण्यासाठी निवडणूक प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींना या समितीपासून दूर ठेवण्याचा हा शासनाचा डाव असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. शिवाय सुधारित मसुद्यानुसार व्यवसाय परवान्यासाठी फेरीवाल्यांना जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावरसुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. आर्थिक दुर्बलता हाच निकष ग्राह्य धरून व्यवसाय परवान्यांचे वाटप करावे, अशी सूचना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सुधारित अधिसूचनेनुसार पथ विक्रेता अधिनियमात अनेक बदल करण्यात आले आहे. यातील बहुतांशी बदल फेरीवाल्यांच्या अस्तित्वात घाला घालणारे असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.फेरीवाला नियोजन समितीवर एकूण १७ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात ४0 टक्के म्हणजेच सात ते आठ फेरीवाल्यांचे प्रतिनिधी असणार आहेत. विशेष म्हणजे शहरात विविध राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली अनेक फेरीवाला संघटना कार्यरत आहेत. निवडणुकीमुळे संघटनांत परस्पर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकूणच ही सुधारित नियमावली फेरीवाल्यांवर अन्याय करणारी व खर्चिक असल्याचे मत फेरीवाला संघटनांनी व्यक्त केले आहे.