शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळ १ ला लाभले अकरावे आयपीएस अधिकारी

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला आहे. या तीन दशकांमध्ये नवी मुंबईमध्ये काम करणारे व भारतीय पोलीस सेवेत गेलेले ते अकरावे

नामदेव मोरे, नवी मुंबईपरिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला आहे. या तीन दशकांमध्ये नवी मुंबईमध्ये काम करणारे व भारतीय पोलीस सेवेत गेलेले ते अकरावे अधिकारी आहेत. पहिले उपायुक्त के. पी. रघुवंशी, हेमंत करकरे यांच्यासह अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या परिसरात कामाची स्वतंत्र छाप पाडली आहे. नवी मुंबई परिमंडळ एकचे २१ वे उपायुक्त म्हणून शहाजी उमाप यांनी आॅगस्ट २०१४ ला कार्यभार स्वीकारला. चेहऱ्यावरून मवाळ वाटणाऱ्या या अधिकाऱ्याने पदभार स्वीकारताच शहरात एकही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले. नवीन अधिकारी आला की बार, जुगार व इतर ठिकाणी धाडी टाकणे हे नित्याचेच असल्यामुळे कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु उमाप यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. सर्व जुगार अड्डे बंद केले. मटका, आॅइल चोरी, लेडीज बार, उघड्यावर सुरू असलेले मद्यपान, व्हिडीओ पार्लर, गणेशोत्सवातील जुगार सर्वांवर कारवाईचा धडाका सुरू केला. तुर्भे, बेलापूर व इतर अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे सुरू असलेले जुगार अड्डे पहिल्यांदाच पूर्णपणे बंद झाले. त्यांच्या या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक झाले. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी सहजपणे केले. करावे परिसरातील महिलेच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्यातील सर्व मतदार याद्या तपासल्या व त्या महिलेचा पत्ता व आरोपी दोन्ही शोधून काढले होते. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या उमाप यांना भारतीय पोलीस सेवेत बढती मिळाली आहे. नवी मुंबईमध्ये काम केलेले व आयपीएस झालेले ते अकरावे अधिकारी ठरले आहेत. नवी मुंबई हा पूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाचा भाग होता. १ नोव्हेंबर १९८५ मध्ये के. पी. रघुवंशी हे पहिले उपायुक्त झाले. पुढे एटीएस प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्यानंतर आलेले पी. पी. श्रीवास्तव ही आयपीएस झाले. मोहल्ला कमिटीची संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरेश खोपडे यांनीही नवी मुंबईत काही काळ काम केले आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे हेही नवी मुंबईमध्ये कार्यरत होते. यानंतर विजय कांबळे, बी. एस. शिंदे, आर. डी. शिंदे, प्रताप दिघावकर व आता शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला असून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.