शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ आणि बदलापूरच्या महापालिकेला भाजपाचाच खोडा

By admin | Updated: December 10, 2015 01:54 IST

अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले

पंकज पाटील, बदलापूर अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले असतानाही बदलापूरमधील भाजप नेत्यांनी घरचा अहेर देत दोन्ही शहरांची महापालिका करण्यास विरोध दर्शवला आहे. दोन्ही शहरांची एकत्र महापालिका झाली तर अंबरनाथमध्ये वरचढ असलेली शिवसेना बदलापूरमध्येही पक्षाचे प्राण कंठाशी आणेल, असे सांगत दोन्ही शहरांच्या दोन स्वतंत्र महापालिका कराव्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. बदलापूरमधील राष्ट्रवादीने भाजपच्या स्ूारात सूर मिसळला असला, तरी शिवसेनेने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. अंबरनाथमध्ये मात्र भाजपची स्थिती फारशी भक्कम नसल्याने तेथे विरोधाची धार एवढी तीव्र नाही. अंबरनाथ आणि बदलापूरच्या एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव गेली पाच वर्षे चर्चेत होता. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. निवडणुकांना सहा महिने उलटत नाही तो पुन्हा राज्य सरकारने महापालिकेचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे जाहीर केल्याने खास करून बदलापूरच्या भाजप नेत्यांत अस्वस्थता आहे. विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर महापालिकेच्या विषयाला नव्याने तोंड फुटले आहे. बदलापूरमधील भाजपचे गटनेते राजन घोरपडे यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. भाजपची सत्ता असली तरी बदलापूरकरांचा विचार करुन आम्ही निर्णयाला विरोध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरांच्या विकासाचा हा निर्णय आहे. भाजपचा विरोध राजकीय स्वार्थासाठी आहे. दोन्ही शहरांची एकत्रित माहापालिका झाल्यास ताकद कमी होईल, या भीतीपोटी ते विरोध करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे.