शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची परवड

By नारायण जाधव | Updated: September 5, 2023 16:25 IST

शीव-पनवेल महामार्गावर गर्दी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने राज्यभरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचे सर्वाधिक पडसाद मराठवाड्यातच उमटले आहेत. त्यातच आंदोलकांनी पहिल्याच एसटीची शिवशाही बस पेटवून दिली होती. यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून एसटी महामंडळाने आपल्या अनेक बस फेऱ्यांची सेवा बंद केली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील प्रवाशांना बसला आहे. एसटी बंद असल्याने त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतल्याने या ट्रॅव्हल्सच्या चालकांनी आपले दर दीड ते दोन हजार असे अव्वाच्या सव्वा केल्याच्या तक्रारी आहेत.

येथील प्रवाशांना मोठा फटका

मराठाआरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी जवळपास ४६ आगार बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, बीड व धाराशीव, लातूर या जिल्ह्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. एसटीचे सुमारे सव्वापाच कोटीहून अधिक नुकसान झाले आहे.

सव्वातेरा कोटींचे नुकसान

एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे ६२०० फेऱ्या बंदमुळे रद्द केलेल्या होत्या. यामुळे महामंडळाचे दोन कोटी ६० लाखाहून अधिक नुकसान झालेले आहे. आतापर्यंतच्या आंदोलनामुळे १३ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळाने सोमवारी स्पष्ट केले होते.

शीव-पनवेल महामार्गावर गर्दी

मुंबईतून मराठवाड्यात जाणाऱ्या बहुतेक खासगी ट्रॅव्हल्स या शीव-पनवेल आणि जुन्या मुंबई-पुणे मार्गाने पनवेल मार्गे जातात. यामुळे एसटी बंद असल्याने मराठवाड्यातील गावी जाण्यासाठी मराठवाडावासीय शीव-पनवेल महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स पकडण्यासाठी गर्दी करीत आहेत. ही गर्दी वाशी, कळंबोलीत मॅकडोनाल्डसह पनवेल बसस्थानकाबाहेर जास्त प्रमाणात दिसत आहे. रात्रीच्या वेळी तर जत्रेचे स्वरुप आलेले दिसत आहे.

मदतीसाठी हेल्पलाईन

गेल्या आठवड्यात आरटीओने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी लूट करू नये यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. याच क्रमांकावर मराठवाडाच नव्हे तर राज्यातील कोणत्याही भागात जाणाऱ्या प्रवाशाची कुणी लूट करीत असेल, जास्त भाडे आकारत असेल, तर त्यांनी ८८५०७८३६४३ या व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार करावी, संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओने केले आहे.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षणstate transportएसटीMarathwadaमराठवाडा