शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानला जलदुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 23:54 IST

जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत :  पाणी हेच जीवन हे फक्त कागदावरच राहिले आहे. गेली पाच दिवस एमजेपीकडून माथेरानकरांना मुबलक प्रमाणात पाणी असूनही मिळत नसल्याने माथेरानकर पुरते हवालदिल झाले आहेत. पाणी असूनही दुष्काळाची स्थिती माथेरानमध्ये झाली असून जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

माथेरानला शार्लोट तलाव व नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा होतो. नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा बंद आहे तर शारलेट तलावामधून होणारा पुरवठा विजेचे कारण पुढे करत चालढकल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांसह दुकानदार पाणी नसल्याने हवालदिल झाले आहेत. काही दुकानदारांनी पाणी नसल्याने दुकाने बंद केली आहेत. तर महिलांकडून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.माझे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेली पाच दिवस पाणी आले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या माथेरान कार्यालयात गेलो असता कोणीही अधिकारी येथे हजर नव्हता. आम्हाला पाणी हे वाणिज्य दराने मिळते. असे असताना पाणी मिळत नसताना देखील आम्ही बिल का भरावे? अशी तक्रार स्थानिक रेस्टॉरंट मालक अरविंद शेलार यांची आहे.

नेरळहून जुम्मापट्टी, जुम्मापट्टी ते वॉटर पाईप आणि वॉटर पाईप ते माथेरान असे तीन टप्यात पंप आहेत. त्यातील पंप नादुरुस्त झाले. ते दुरुस्त करून आणले आहेत. बुधवारपासून पाणी सुरळीत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.- पांडुरंग पाटील, शाखा अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMatheranमाथेरान