आमिषाला बळी पडू नका

By Admin | Updated: July 8, 2017 05:55 IST2017-07-08T05:55:35+5:302017-07-08T05:55:35+5:30

लंैगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे, हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे आणि त्यासाठी आपण आपली

Do not fall prey to amishas | आमिषाला बळी पडू नका

आमिषाला बळी पडू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : लंैगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे, हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे आणि त्यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असा महत्त्वाचा सल्ला कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शालेय विद्यार्थिनींना त्यांच्याशी सुसंवाद करताना दिला.
महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, रोज कुठे ना कुठे अत्याचाराची घटना घडल्याची बातमी ऐकायला येत आहे. याबाबत महिलांनी विशेष काळजी घ्यावी, विशेष करून शालेय विद्यार्थिनींनी याबाबत काय दक्षता घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी येथील कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक तानवडे यांनी मुलींनी स्वत:चे रक्षण केले पाहिजे, मुलांच्या बदलणाऱ्या मानसिकतेला एक मुलगी म्हणून कसे सामोरे जावे, तसेच आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले चारित्र्य संपन्न जीवन कसे जगावे? याविषयी मार्गदर्शन केले. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे, त्यासाठी कशी काळजी घ्याल? कसे वागाल? या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. या वेळी शहरात फिरणारे दामिनी पथक काय कार्य करत आहेत, याची माहिती दिली. दामिनी पथकातील वैदेही सावंत यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधताना, मी कोणत्याही वेळी तुमच्या मदतीला धावून येईन, असा शब्द दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे स्वागत केले. श्रद्धा मुंढेकर यांनी आभार मानले. या वेळी वृषाली यादव, स्नेहा गाढे, मेघा पिंगळे, प्रेमा पिंगळे, स्मिता गणवे, आरती कोकरे, माधुरी देशमुख, वृषाली माळी, सुषमा सुपे, सुप्रिया भासे, अर्चना भुसाळ आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Do not fall prey to amishas