खारघरमधील जमीन घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 16:22 IST2018-07-07T16:21:18+5:302018-07-07T16:22:07+5:30
खारघरमधील सिडकोच्या २४ एकर भूखंड घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी खारघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.

खारघरमधील जमीन घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन- संजय निरुपम
पनवेल: खारघरमधील सिडकोच्या २४ एकर भूखंड घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी खारघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी खारघरमधील वादग्रस्त जागेची पाहणी देखील निरुपम यांनी केली.
भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात नारेबाजीसुद्धा केली. या भूखंड घोटाळ्यातील सर्व व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी स्थगिति दिली म्हणजे काहीतरी गडबड असल्याचे निरुपम यांनी सांगितले. संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, सिडकोचे तत्कालीन एमडी भूषण गगराणी व पनेवलचे तहसीलदार यांना तत्काल निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.