शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी पसरवतेय डेंग्यू, मलेरियाची साथ

By admin | Updated: July 17, 2017 01:34 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य काळजी घेतलेली नाही. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर ठेवलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत असून, यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने एपीएमसीला व येथील प्रशासनाने व्यापाऱ्यांसह ठेकेदारांना नोटीस पाठविण्यात सुरवात केली आहे. नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागल्याने महापालिका प्रशासनाने शहरभर जनजागृती सुरू केली आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस दिल्या जात आहेत. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर कारवाईचा इशाराही दिला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. फळ मार्केटमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या छतावर व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मार्केटमधून जप्त केलेल्या हातगाड्या याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. गटारांचे काम पूर्ण झाले नसल्याने सर्व पाणी एकाच ठिकाणी साचून रहात आहे. याशिवाय भाजी व फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर मोकळे क्रेट्स ठेवले आहेत. गाळ्यांवर अनधिकृतपणे पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्या टाक्यांची साफसफाई केली जात नाही. पाणी साचून रहात असल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. याशिवाय मार्केटमध्ये कँटीन व इतर खाद्यपदार्थ विक्रेते त्यांच्याकडील शिल्लक खाद्यपदार्थ गटारामध्ये टाकत असून सर्व गटारांमध्ये गाळ साचला आहे. जागोजागी पाणी साचत असल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. भाजी मार्केटला लागून व कृषी प्लाझाच्या मागील बाजूलाही एपीएमसीने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पालिकेच्या जलउदंचन केंद्राच्या बाजूला मोठा खड्डा तयार केला आहे. या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याशिवाय बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. विस्तारित भाजी मार्केट व फळ मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे परप्रांतीय कामगार वास्तव्य करत आहेत. या कामगारांमुळेही मार्केटमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत असून साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने नोटीस पाठविल्यानंतर बाजार समिती प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी व ठेकेदारांना बाजार समिती प्रशासन स्वत: नोटीस बजावत आहे. मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला असून दोन दिवसांपासून नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.